पैसा म्हणजे काय?
* पैसा ही वस्तू व्यवहाराचे सर्वात सक्षम साधन आहे. वस्तूंच्या अदलाबदलीने होणाऱ्या व्यवहारांमधील प्रचंड गैरसोय पैशाच्या वापराने दूर झाली.
* वस्तू आणि सेवा या दोन्हींचे मूल्य पैशात करता येत असल्यामुळे पैसा हे माध्यम सर्वच व्यवहारांना उपयुक्त आहे.
* पैसा हे संपत्तीचे अर्थात श्रीमंतीचे मोजमाप आहे.
पैसा कसा मिळवावा?
* "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी', ही तुकोबांची उक्ती डोळ्यासमोर ठेवून पैसा मिळवावा आणि खर्च करावा. धन मिळवण्याच्या मार्गाच्या भलेपणाविषयी थोडी जरी शंका असेल, तरी तो मार्ग त्याज्य समजावा.
* प्रामाणिकपणे कोणाचीही फसवणूक न करता आणि उचित व्यवहारांचा अवलंब करून पैसा मिळवावा.
* "पैसा म्हणजेच सर्व काही आहे,' हे मानणारे पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. मिळविलेल्या पैशाचा आनंद घेता येईल इतकाच पैसा मिळवावा.
अधिक पैसा म्हणजे अधिक चांगले जगणे, हे बरोबर आहे का? ते कसे साध्य करावे?
* पैसा सुज्ञ माणसाच्या फक्त मनात असावा; हृदयात नसावा.
* चांगले जगणे म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होऊन शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचा लाभ मिळणे. यासाठी किती पैसा हवा, हे त्या व्यक्तीच्या मनोभूमिकेवर अवलंबून असते.
* सुखी आयुष्य जगायला एका मर्यादेपर्यंतच पैसा आवश्यक असतो. त्यापेक्षा अधिक मिळालेला पैसा, ते परतफेड करू शकणार नाही, अशांसाठी खर्च केला तर त्याचे समाधान शब्दातीत आहे.
* "चंगळवाद वाईट' असे म्हणताना चंगळवादाची व्याख्या कालमानानुसार बदलत जाते, हे लक्षात ठेवले पाहिजे. कालची चैनीची वस्तू आज गरजेची बनते. पूर्वी घरातील सर्वांसाठी एकच फोन असे. आता लहान मुलासह प्रत्येकाकरिता तो आवश्यक बनला आहे. पण नवीन मॉडेलच आपल्याकडे हवे, हा अट्टहास चुकीचा आहे.
* वाजवी अपेक्षा बाळगून आणि अनावश्यक स्पर्धा टाळून आयुष्य सुखी व्हायला मदत होईल.
कौटुंबिक अर्थसंकल्प कसा करावा?
* आर्थिक नियोजन सर्वांसाठी आवश्यक आहे आणि अर्थसंकल्प हे त्याचे फलित. असे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी घरातील सर्वांनी एकत्र बसून विचारविनिमय करून समान भूमिका निश्चित करणे आवश्यक.
* "आपल्याला कोठे जायचे आहे' ते आधी ठरवावे. म्हणजेच साधारणपणे पुढच्या 10-15 वर्षांची योजना तयार करावी- ज्यात ठळक बाबींचा समावेश असेल. तसे केले तर म्युच्युअल फंडातील "एसआयपी'सारखी नियमित गुंतवणूक आजच चालू करता येते.
* अर्थसंकल्पात घरातील सर्वांच्या इच्छा-आकांक्षाचे प्रतिबिंब दिसणे अपेक्षित आहे आणि त्या पूर्ण करण्याकरता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याची बांधिलकी राहते.
* परिस्थितीनुसार अर्थसंकल्प बदलावा लागेल, याचेही भान ठेवले पाहिजे. जमा आणि खर्च या दोन्हींचा विचार करताना, जमा रक्कम अपेक्षेपेक्षा कमी धरावी आणि खर्च मात्र जास्त होईल, असे समजावे.
* आवश्यक त्याकरिता व आवश्यक तेवढेच कर्ज घ्यावे, जे व्यवस्थितरीत्या नंतर फेडता येईल.
पंधरा हजार रुपयांत घर कसे चालवावे?
* तुम्ही ज्यावर खर्च करता, यावरून तुमच्या आयुष्यात महत्त्व कशाला आहे, ते कळते.
* आपला जमा आणि खर्च किती होतो, याचा अनेक जणांना पत्ताच नसतो. 80ः20 तत्त्वाचा उपयोग करून महत्त्वाचे खर्च लिहून ठेवावेत. सर्वात जास्त रकमेपासून खर्च कमी करायला सुरवात करावी.
* रु. 13 हजार एवढ्याच रकमेचा खर्च करता येईल, हे आधीच पक्के ठरवावे. महिना किमान दोन हजार रुपयांची बचत किंवा गुंतवणूक करता आली पाहिजे. प्राधान्यानुसार खर्च करावा.
महागाईवर मात कशी करावी?
* आर्थिक नियोजनात दोन वर्षांनंतरच्या खर्चाच्या बाबी निश्चित करताना त्यामध्ये वाढत्या महागाईचा विचार केला पाहिजे.
* जमा-खर्चाची मिळवणी करताना काटकसर करण्यावरच भर दिला जातो. पण उत्पन्न कसे वाढेल, याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. नोकरी करणाऱ्याला आपली क्षमता वाढवून बढती किंवा अधिक पगाराची दुसरी नोकरी मिळवता येते, तर व्यावसायिकाला जास्त कार्यक्षमता दाखवून अधिक फायदा मिळवता येईल. चांगली गुंतवणूक करूनही पैसा वाढवून महागाईवर मात करता येते.
* खर्च कमी करण्याची किंवा उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी घरातील सर्वांची आहे, फक्त गृहिणीची नाही. आवश्यकतेनुसार प्रत्येकानेच खर्चाला मुरड घातली पाहिजे किंवा अधिक पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला पाहिजे. उदा.- सुटीच्या दिवशी काम करणे, शिकवण्या करणे किंवा छोटा व्यवसाय करणे, आदी.
बचतीचे महत्त्व आणि तिचे नियोजन कसे करावे?
* वयाच्या पंचविशीतच बऱ्यापैकी पैसा हाती खेळू लागल्यानंतर मौजमजेवर अधिक पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे याच वयापासून बचतीची सवय लागणे आवश्यक.
* दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम कटाक्षाने बाजूला ठेवण्याची सवय लावून घ्यावी. कारण अडीअडचणीच्या वेळी हीच रक्कम उपयोगी पडते.
* निव्वळ काही पैसे बाजूला ठेवणे किंवा बचत करणे किंवा बॅंकेत अथवा पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही.
* आधी बचतीची सवय लागल्यास पुढे गुंतवणुकीची कास धरणे सोपे जाते. कारण बचतीनंतर येते ती गुंतवणूक.
* बचतीतून उभे राहणारे पैसे तुमची तात्कालिक गरज भागवू शकतात, तर गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घ पल्ल्याची उद्दिष्टे साध्य करता येतात.
* वाढत जाणारी महागाई, त्यायोगे वाढणारा वैद्यकीय खर्च, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कालांतराने गरजेची वाटू लागणारी निवृत्तीनंतरची तरतूद या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कमावत्या वयातच आर्थिक नियोजन करावे.
* आर्थिक नियोजनातील पहिली पायरी म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्ट निश्चित करणे.
* बचतीची सवय, गुंतवणुकीचा मनोनिग्रह, जोखीम घेण्याची मानसिकता आणि तयारी यावरच उद्दिष्टपूर्ती अवलंबून.
* गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या गरजेप्रमाणे गुंतवणूक प्रकारांचा आराखडा तयार केला पाहिजे.
* बाजारातील विविध गुंतवणूक प्रकारांचा विचार करून आपल्या उद्दिष्टाला साजेशा गुंतवणूक प्रकारांची निवड करणे आणि त्यांचे प्रमाण निश्चित करणे महत्त्वाचे.
* गुंतवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये 1) बॅंकेतील मुदतठेव योजना (एफ.डी.), 2) पोस्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अल्पबचत योजना (नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट अर्थात एन.एस.सी., किसान विकास पत्र, मंथली इन्कम स्कीम अर्थात एम.आय.एस., रिकरिंग ठेव योजना (आर.डी.) वगैरे), 3) निवडक राष्ट्रीयीकृत बॅंका तसेच पोस्टात राबविली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ.) योजना, 4) सरकारी रोखे किंवा बॉंड्स, 5) आयुर्विमा आणि युलिप, 6) पेन्शन प्लॅन्स, 7) म्युच्युअल फंड, 8) शेअर बाजार, 9) स्थावर मालमत्ता (घर, जमीन वगैरे), 10) सोने-चांदी यांचा प्रामुख्याने समावेश.
* आपले वय आणि त्याच्या प्रमाणात जोखीम स्वीकारण्याची क्षमता यावर गुंतवणुकीचे प्रमाण ठरवावे. जर तुम्ही 40 वर्षांचे असाल तर 40 टक्के गुंतवणूक सुरक्षित व निश्चित उत्पन्न देणाऱ्या ठेव योजनांत व 60 टक्के शेअर बाजार किंवा त्याच्याशी जोडलेल्या गुंतवणूक साधनांत करणे योग्य.
* जसे वय वाढत जाते तसे जोखीमपूर्ण गुंतवणुकीचे प्रमाण कमी करत जाणे श्रेयस्कर.
आर्थिक हिशेबाच्या, गुंतवणुकीच्या नोंदी कशा ठेवाव्यात?
* "टु ब्रेक रेकॉर्ड, कीप रेकॉर्ड' ही उक्ती आर्थिक नियोजनातही लक्षात ठेवावी.
* आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य होत आहे किंवा झाले आहे, हे लक्षात येण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
* विमा, मुदतठेवी, पोस्टातील गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉंड्स आदी प्रकारांतील गुंतवणुकीचे तपशील एका वहीत टिपून ठेवावेत. शक्य असेल तर संगणकात "एक्सेल शीट'मध्ये मांडणी करून "सेव्ह' करून ठेवावे.
* पॉलिसी क्रमांक, खाते क्रमांक, ठेव पावती क्रमांक, फोलिओ नंबर, डिमॅट नंबर या महत्त्वाच्या नोंदीबरोबरच मुदतपूर्तीची तारीख, परतीची रक्कम आदींसाठी रकाने करून ते वेळच्या वेळी भरावेत.
* यादी करताना मुदतपूर्ती म्हणजेच पैसे परत कधी मिळणार आहेत, त्या तारखेला प्राधान्य द्यावे. म्हणजे एक-एक गुंतवणूक प्रकार संपला आणि त्या बदल्यात पुन्हा नव्याने गुंतवणूक केल्यास त्याचा अग्रक्रम बदलावा. अशा यादीमुळे तुमची "आर्थिक तब्येत' एका दृष्टिक्षेपात कळू शकेल.
अपुरी मिळकत असेल तर जोड काय देता येईल? कशी? अधिक पैसा मिळविण्याच्या स्वतःच्या क्षमतांचा शोध कसा घ्यावा?
* नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारी रक्कम आपला घरसंसार चालवायला पुरेशी ठरत नसेल, तर त्याला आपल्या क्षमतेनुसार जोड देता येऊ शकते.
* अशी जोड देण्यापूर्वी आपल्या हाताशी असणारा वेळ, पात्रता, मिळणारे उत्पन्न यांचा प्रामुख्याने विचार करावा.
* एखाद्या किराणा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला पहाटे किंवा सकाळच्या वेळेत घरोघरी वृत्तपत्रे वितरित करणे, दुधाच्या पिशव्या नेऊन देणे आदी कामे करून आपल्या मिळकतीला जोड देता येऊ शकते.
* आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे सहजशक्य नाही. मात्र आपल्यातील कलागुणांना वाव देऊनदेखील चार पैसे मिळविता येऊ शकतात. उदा.- विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेणे, वाद्य वाजवायला शिकवणे, क्रीडा प्रशिक्षण देणे.
जोडधंद्याचे धाडस कोणी करावे? ते कसे पेलावे?
* धाडस हा श्रेष्ठ गुण आहे; पण आपल्याला काय करायचे आहे, काय हवे आहे, याचा निर्णय आधी करायला हवा.
* धाडसाच्या शेवटी यश हवे असेल, तर नीट तयारी करून जोखीम घेणे जरुरीचे आहे.
* धाडस करताना प्रसंगी जायबंदी होण्याची किंवा इतरांची सहानुभूती न मिळता जखमी होण्याची तयारी हवी.
* जोडधंद्याचे धाडस करताना आपली कुवत, जोखीम घेण्याची क्षमता तपासून पाहायला हवी.
* जो धाडस करतो, धडपडतो, प्रयत्न करतो, अपयशाने खचून न जाता त्यातून शिकून बाहेर पडतो, तोच यशस्वी होतो, हे लक्षात ठेवावे.
* धाडस करताना मनाची व शरीराची तंदुरुस्ती महत्त्वाची असते. स्वतःमध्ये निर्भयता हवी, बिनधास्त वृत्ती हवी, झोकून देण्याची तयारी हवी, संकटावर मात करण्याची क्षमता हवी. हे सर्व अंगी बाणवून त्याप्रमाणे वागण्याची तयारी असणाऱ्यांनीच धाडस करावे.
* तोलूनमापून घेतलेली जोखीम (कॅलक्युलेटेड रिस्क) आणि अभ्यास न करता पत्करलेली जोखीम यात फरक आहे.
* जोडधंद्याचा अभ्यास करून धोका पत्करणे योग्य. अन्यथा सपाटून अपयश येण्याची शक्यता अधिक.
मराठी साम्राज्य
Plz join our MARATHI SMS blog and get 100% FREE MARATHI SMS everyday on your MOBILE for JOIN plz type ON MI-MARATHA and SEND to 9870807070. and for join second blog plz type ON 96kulimaratha and SEND to 9870807070.
सोमवार, १७ जानेवारी, २०११
सिंहाचं पिल्लू
सिंहाचं पिल्लू बघायला जंगलातले सगळे प्राणी जमले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांत खूप खूप कौतुक होतं...सिंह आणि सिंहीण तर छोट्या सिंहाच्या आगमनानं हरखून गेले होते...एकमेकांच्या डोळ्यांत खोल बघत होते; जणू त्यांना त्या पिल्लामध्ये स्वतःचं बालपण दिसत होतं...सिंह आणि सिंहीण जंगलातल्या सगळ्या प्राण्यांशी, पक्ष्यांशी इतके मायेनं वागत की, त्यांच्या आनंदात सगळं जंगल आनंदून गेलं होतं...गुहेतल्या जुन्या-जाणत्या सिंहांनी पिल्लाला आशीर्वाद दिले आणि जंगलातल्या सर्वांच्या साक्षीनं काही ज्येष्ठ हत्ती, जिराफ यांच्याशी चर्चा करून पिल्लाचं नाव "अमर' ठेवलं....सगळ्यांनी जल्लोष केला. माकडांनी झाडाच्या फांद्या हलवून फुला-पानांचा सडा पाडला...सगळ्या पक्ष्यांनी किलबिलाट करून "अमर'चं स्वागत केलं आणि आशीर्वादही दिले.
"अमर' हळूहळू मोठा होऊ लागला...सगळ्यांनी मिळून त्याला प्रत्येक गोष्टीत तरबेज करायचं, असं ठरवूनच टाकलं होतं...चित्त्यांनी त्याला सुसाट धावण्यात तरबेज केलं...उंटांनी त्याला जंगलाबाहेरील वाळवंटाच्या गोष्टी सांगितल्या...हत्तीनं जुने अनुभव सांगून शहाणं केलं आणि बगळ्यांनी चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. सिंह आणि सिंहीण यांनी तर प्रत्येक छोट्या गोष्टीकडं बारीक लक्ष देऊन "अमर'ला शहाणं केलं आणि साऱ्या जंगलाचं बाळ असणारा अमर आता सगळ्यांचा "अभिमान' झाला...
शक्तिवान, गुणवान झालेला तरणाबांड सिंह "अमर' एकदा फिरत फिरत दूरच्या दुसऱ्या एका जंगलात येऊन पोचला...सुंदर फुलं, स्वच्छ निळंशार पाणी, शांतता यामुळं "अमर' वेडा होऊन त्या जंगलात फिरत राहिला...तिथले प्राणी, पक्षी यांनीसुद्धा गुणी, हुशार, बलवान असलेल्या "अमर'चं मनापासून स्वागत केलं आणि घरच्या जंगलासारखाच तो या नव्या जंगलातही लोकप्रिय होऊ लागला...
"अमर' या नव्या जंगलात रुळला खरा; पण त्याला त्याच्या आई-बाबांची खूप आठवण यायला लागली आणि इकडे आई-बाबासुद्धा त्याच्या परत येण्याची वाट पाहू लागले...आई तर "अमर'च्या आठवणीत वेडीपिशी झाली; पण बाबाने तिला समजावलं..."" "अमर'ला आठवण येत असेलच गं आपली; पण आपला अमर आहेच असा की, तो जाईल तिथे इतका आवडेल सगळ्यांना की, त्या जंगलात त्याला आग्रहानं ठेवून घेतलं असेल सगळ्यांनी...'' आणि "अमर'सुद्धा जुन्या जंगलातल्या सोबत्यांच्या आणि आई-वडिलांच्या आठवणीनं खूप खूप रडायचा; पण त्याला नवीन जंगलाचा आग्रहही मोडवत नव्हता.
एक दिवस जुन्या जंगलात आलेल्या हरणांच्या कळपानं बातमी आणली की, "अमर'ला एक सिंहीण भेटलीए आणि त्यांना एक गोड गोड पिल्लू झालंय...या बातमीनं "अमर'च्या आईचा बांध फुटला आणि...आणि...आणि...
""पुढे सांग ना आज्जी,'' ओम म्हणाला..""हॅलो...हॅलो आज्जी गं...सांग ना गं..तुला दिसतोय का मी? आज्जी तो माईक जवळ घे आणि कॉम्प्युटरच्या कॅमेऱ्यासमोर ये...त्याच्याशिवाय कशी दिसशील तू मला? मी इतक्या सकाळी उठलोय ना रविवार असून ते फक्त तुझी गोष्ट ऐकायला. नाही तर अमेरिकेत कोणीही रविवारी लवकर उठत नाही...सांग ना! आज्जी! पुण्यात थंडी आहे का हो आजोबा? आजोबा, सांगा ना...''
""तुला किती वेळा सांगितलंय मी आई-बाबांची आणि पिल्लाची गोष्ट नको सांगूस..पण नाही! दर वेळेला प्राणी बदलतो...कधी मांजर, कधी चिमणी, कधी सिंह; पण गोष्ट तीच सांगतेस तू सुषमा'' अरुणरावांचा पारा चढला होता. चिडण्यापेक्षाही त्यांना सुषमाला होणाऱ्या त्रासाची काळजी वाटत होती. ""नातू गोष्ट सांग म्हणतो आणि पुण्यातून तू चॅटिंग करताना दर वेळी रडतेस कशासाठी? आपल्या मुलाचं आपल्यावर खूप प्रेम आहे, हे तुलाही माहितीए, मग त्याच्या लांब असण्याचा किती त्रास करून घेणार आहेस तू...? आणि दरवर्षी भेटतो की आपण...!''
""मी दर वेळेला तीच गोष्ट सांगते ना? मग दर वेळेला दारामागे उभे राहून तीच गोष्ट दर आठवड्याला कशाला ऐकता? आणि मी मागे वळले की निघून जाता! वर म्हणताय, मी रडते...मग शेजारच्यांच्या नातवाला रोज फिरायला का घेऊन जाता...? एक दिवस तो गावाला गेला तर चार वेळा विचारून आलात, "कधी येणार आमचा छोटा मित्र?' सांगा? आता का गप्प? तरी आपली मी गोष्टीतला चिमणा असो वा सिंह...समजूतदार असतो म्हणून सांगते...''
""हॅलो, हॅलो, आजी-आजोबा, तुम्ही काय बोलताय? इतकं पटापटा मराठी नाही समजत मला,'' ओम म्हणाला.
""अरे, आजोबा मला पुढची गोष्ट सांगत होते.''
""बरं झालं, सांगितली त्यांनी पुढची गोष्ट. आता पूर्ण सांगशील तरी मला तू...दर वेळेला त्या "अमर'ला पिल्लू झालं की तू गोष्ट बंदच करतेस...म्हणतेस, आजोबांना जेवायचंय आता...आणि पुढच्या रविवारी परत पहिल्यापासून सांगतेस...सांग ना आज्जी! पुढं काय होतं?''
""पुढची गोष्ट मी सांगतो,'' टेनिस खेळून आलेला "अमर' म्हणाला, ""बाबा, तुला माहितीए पुढची गोष्ट?''
""ओम येस...! मला माहितीए...''
""नव जंगल त्या "अमर'ला पकडून ठेवतं..."अमर'ला येते जुन्या जंगलाची आठवण! आई-बाबांची आठवण! पण नवीन जंगलातले मित्र त्याला "थांब रे, थांब रे' म्हणतात आणि तो थांबतो...पण एक दिवस "अमर'चं पिल्लू म्हणतं की, मला आजी-आजोबांना रोज...सारखंसारखं भेटायचंय...त्यांच्या अंगा-खांद्यावर खेळायचंय...मांडीवर बसून रोज गोष्टी ऐकायच्यात...त्यांच्याबरोबर फिरायला जायचंय...''
मग "अमर' आणि त्याची सिंहीण म्हणते की, आता मात्र आपल्याला जुन्या जंगलात जायलाच हवं...आपल्या पिल्लाला आपले जुने सोबती, जुने डोंगर, नद्या दाखवायलाच हव्यात...''
आणि मग ते जुन्या जंगलात परत जायचं ठरवतात...अगदी लगेच...
सुषमाताई आणि अरुणरावांना समोरचा कॉम्प्युटर पुसट दिसायला लागला...ते काही बोलणार इतक्यात, त्यांना पलीकडे संवाद ऐकू आला, 'ए बाबा! किती मस्त, त्या पिल्लाला आजी-आजोबा भेटणार आता. ए बाबा, आजी नेहमी अर्धवटच गोष्ट सांगते...त्या सिंहाच्या-अमरच्या-पिल्लाचं नाव काय असतं रे? '
""बाळा, ओम...ओम असतं अमरच्या पिल्लाचं नाव...! ओम!

सोन्याची अमेरिका'
सोन्याची अमेरिका'
अमेरिकेने 2006 मध्ये 242 टन सोन्याचे उत्पादन केले. तुलनाच करायची झाली तर, भारताचे सोन्याचे उत्पादन त्या वेळी 2.6 टन एवढे होते! यातील 80 टक्के उत्पादन नेवाडा या राज्यात होते. सोन्यामध्ये स्वयंपूर्ण असलेला हा देश सोन्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. सोन्याच्या दागिन्यांच्या खपात अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक अर्थातच भारताचा! एकूणच अमेरिकेतील "सोने प्रकरण' गमतीदार आहे. त्यावर हा ओझरता झोत...
तारीख 24 जानेवारी 1848. उत्तर कॅलिफोर्नियातल्या "अमेरिकन' नदीजवळ लाकडाचा कारखाना उभारण्याचं काम सुरू होतं. जेम्स मार्शलला नदीत काहीतरी चकाकताना दिसलं. धडधडत्या हृदयानं त्यानं तो तुकडा हातात घेतला आणि त्याची लगेचच खात्रा पटली : ते सोनंच होतं! मार्शल आणि त्याच्या कामगारांनी थोडा वेळ जल्लोष करून पुन्हा कामाला सुरवात केली; पण त्यांना काम करता करता अधिकाधिक सोनं सापडू लागलं. त्यानंतर पुढे जे घडलं, ते इतिहासात "गोल्ड रश' म्हणून जगप्रसिद्ध आहे. या सोन्याच्या शोधाचा अमेरिकन इतिहासावर अतिशय मोठा परिणाम झाला. नुसत्या अमेरिकेतूनच नव्हे; तर अमेरिकेबाहेरील दक्षिण अमेरिका, चीन, मेक्सिको, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, तुर्कस्तान इत्यादी देशांतून कॅलिफोर्नियाकडे लोक सोन्याच्या शोधात येऊ लागले. सॅन फ्रान्सिस्को शहरानं बाळसं धरलं. कॅलिफोर्नियाच्या अर्थव्यवस्थेचा आणि पर्यायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वेगानं विकास होऊ लागला. रस्ते, लोहमार्ग बांधण्यात आले. आजच्या श्रीमंत महासत्तेचा पाया अशा सोन्याच्या अकस्मात शोधामुळे 1848 ते 1855 मध्ये घातला गेला.
आज दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलियानंतर अमेरिका हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सोने उत्पादक देश आहे. "ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हे'नुसार अमेरिकेने 2006 मध्ये 242 टन सोन्याचे उत्पादन केले. तुलनाच करायची झाली तर, भारताचे सोने उत्पादन त्या वेळी 2.6 टन एवढे होते! यातील 80 टक्के उत्पादन आज, जिथे लास वेगास आहे त्या नेवाडा या राज्यात होते. सोन्यामध्ये स्वयंपूर्ण असलेला हा देश सोन्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. सोन्याच्या दागिन्यांच्या खपात अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक लागतो अर्थातच भारताचा!
कॅरेटपेक्षा दागिना खुलणे महत्त्वाचे
अमेरिकेच्या इतिहासात असामान्य स्थान असलेलं हे सोनं आज अमेरिकन माणसाच्या आयुष्यात भारतीयांइतकं महत्त्वाचं मानलं जात नाही. सर्वसामान्य मध्यमवर्गीय अमेरिकन माणसाकडं अतिशय थोड्या प्रमाणात सोन्याचे दागिने असतात. अनेकांकडे; विशेषत: पुरुषांकडे तर कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने नसतात. भारतीय संस्कृतीत जे स्थान मंगळसूत्राचं आहे, तेच अमेरिकन संस्कृतीत "वेडिंग रिंग'चं आहे; परंतु उच्चमध्यमवर्गात ही रिंग सोन्यापेक्षा हिऱ्याची असणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. अमेरिकेतले सोन्याचे बहुतेक दागिने हे 24 कॅरेटचे नसतात- ते 14 अथवा 18 कॅरेटचे असतात. अमेरिकन स्त्री जेव्हा एखादा दागिना खरेदी करते, तेव्हा ती तो दागिना 14 कॅरेटचा आहे की 24 कॅरेटचा, याचा अजिबात विचार करत नाही. तो दागिना आपल्याला कसा दिसेल याचाच, फक्त ती विचार करते! एखादा चांदीचा दागिना जर सोन्याच्या दागिन्यापेक्षा चांगला दिसत असेल तर तो सोन्याचा दागिन्याऐवजी चांदीचा दागिना घ्यायला ती मुळीच कचरणार नाही.
चांदीसुद्धा सोन्याच्याच मोलाची
अमेरिकेत चांदीला सोन्याच्या तुलनेत भारताएवढं कनिष्ठ समजलं जात नाही. किंबहुना बऱ्याच वेळा अमेरिकन लोकं चंदेरी दिसणाऱ्या पांढऱ्या सोन्याचे दागिने खरेदी करतात! सोन्यात पॅलाडियम, निकेल किंवा तांबे मिसळून पांढऱ्या रंगाचं सोनं तयार करता येतं. अमेरिकन माणूस भारतीयांप्रमाणं सोन्याकडं गुंतवणूक म्हणून पाहत नाही. त्याला सर्वसामान्य भारतीयाप्रमाणे सोन्याचे भाव माहीत नसतात. अमेरिकन समाजात दागिन्यांचं महत्त्व असलं तरी ते सोन्याचेच हवेत, असा अट्टहास नसतो. किंबहुना बऱ्याच वेळा चांदी, पांढरे सोने, हिरे आणि प्लॅटिनम यांना प्राधान्य दिलं जातं. इथल्या लग्नकार्यात किंवा इतर कुठल्याही कार्यात सोन्याची देवघेव (सोने म्हणून; दागिने म्हणून नव्हे) अथवा वापर झालेला मी पाहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य अमेरिकन माणसावर सोन्याच्या भावाच्या चढ-उताराचा फारसा परिणाम होत नाही. एकंदरीतच अमेरिकन समाजात भारताच्या तुलनेत सोन्याविषयी एक प्रकारची अनास्था आढळते.
हिप हॉपर्समध्ये स्टेटस सिंबॉल
अमेरिकन कृष्णवर्णीयांतील एका घटकाला मात्र सोन्याविषयी अप्रूप आहे. 1970च्या दशकात न्यूयॉर्कमधील कृष्णवर्णीयांत हिप हॉप संगीताचा जन्म झाला. या संगीताचा पुढे विस्तार होऊन एक प्रकारची हिप हॉप संस्कृतीच तयार झाली. या संस्कृतीत वाढलेली मुले त्यांच्या पेहरावावरून चटकन ओळखू येतात. उलटी किंवा आडवी टोपी घालणे, ढगळ पॅंट, ढगळ शर्ट आणि त्यावर सोन्याची चेन! हिप हॉपर्समध्ये सोन्याची चेन घालणे हे स्टेटस सिंबॉल मानले जाते. जेवढी मोठी व जड चेन तेवढा तो मनुष्य मोठा! वेगवेगळ्या आकाराच्या, मध्ये अनेक प्रकारची चिन्हे लटकवलेल्या हिप हॉप पद्धतीच्या सोन्याच्या साखळ्या अमेरिकेत सर्वत्र मिळतात. अर्थातच, सर्वसामान्य हिप हॉपर्स नुसत्या सोनेरी रंगाच्या खोट्या साखळ्या घालतात व वरच्या वर्गातील लोक खरंखुरं सोनं वापरतात; पण जे लोक खरं सोनं वापरतात, त्यांच्याही साखळ्या 14 किंवा 18 कॅरेटच्या असतात. भारतीयांसारखा 24 कॅरेटचा अट्टहास नसतो.
पुण्याची पेढी अमेरिकेत
अमेरिकेतल्या अजून एक घटकाला सोन्याविषयी विशेष प्रेम आहे आणि ते म्हणजे भारतीय! भारतीय लोक जगात कुठेही गेले तरी काही गोष्टी बदलत नाहीत. सोन्याचा ध्यास ही त्यातलीच एक गोष्ट. अमेरिकेतल्या जवळजवळ सगळ्या मोठ्या शहरांमध्ये एक भारतीय रस्ता असतो. या रस्त्यांवर सगळ्या भारतीय वस्तूंची दुकाने व भारतीय उपाहारगृहे असतात. अर्थातच, या रस्त्यांवर भारतीय सोन्याच्या पेढ्याही असतात. अलीकडेच काही मराठी पेढ्यांनीही अमेरिकन बाजारपेठेत पाऊल टाकले आहे. पु. ना. गाडगीळ यांच्या "पीएनजी ज्वेलर्स'ने भारतीय बहुसंख्य असलेल्या सॅन फ्रान्सिस्को-बे एरियात आपले दुकान थाटले आहे. भारतीयांच्या या सोन्याच्या ध्यासाचा एक मजेशीर परिणाम अलीकडेच माझ्या पाहण्यात आला. माझा मित्र विशाल लॉस एंजेलिसच्या उपनगरातील व्हॅनोव्हन स्ट्रीटवर राहतो. त्याच्याच घराजवळ जवळजवळ पंधरा भारतीयांचे बंगले आहेत. अलीकडेच त्याच्या घरात चोरी झाली. महागडा लॅपटॉप, स्टिरिओ इत्यादी उपकरणांना चोरांनी हातही लावला नाही; परंतु घरातले सगळे सोने मात्र लंपास केले! विशालने ही गोष्ट जेव्हा आपल्या भारतीय शेजाऱ्याला सांगितली, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात आश्चर्य उमटले नाही. उलट त्यानेच विशालला सांगितले, की इथल्या प्रत्येक भारतीयाकडे सोन्याची चोरी झालेली आहे. अमेरिकन चोरांनाही भारतीयांकडे 24 कॅरेटचे सोने असते, हे ठाऊक आहे!
अमेरिकींनो, सोने विकत घ्या!
जिम क्रेमर सीएनबीसीवर (अमेरिका) "मॅड मनी' नावाची प्रसिद्ध मालिका सादर करतात. न्यूयॉर्कमधल्या एका प्रतिष्ठित लोकांच्या निधी-संकलनाच्या कार्यक्रमात त्यांनी, "किती लोकांनी सोन्यात पैसे गुंतवले आहेत?' अशी विचारणा केली. त्यावर 200 पैकी फक्त 4 लोकांकडेच सोनं असल्याचं त्यांना कळलं! त्यानंतर सोने खरेदी करण्याचा सल्ला आपल्या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दिला. त्यांच्या मते जगातील अनेक देश निर्यात वाढवण्यासाठी आपल्या चलनाची किंमत कमी करीत आहेत. त्यामुळे जगातील महत्त्वाच्या चलनाची किंमत कमी होईल; परंतु सोन्याची किंमत मात्र वाढतच राहील. जिम क्रेमर ही सोनेखरेदीचा सल्ला देणारी एकमेव व्यक्ती नाही. अमेरिकेतील अनेक गुंतवणूक सल्लागार लोकांना सोनेखरेदीचा सल्ला आपापल्या ब्लॉगमधून आणि वेबसाइटवरून देत असतात; पण कितीही समजावलं तरी त्याचा अमेरिकन लोकांवर फारसा परिणाम होत नाही. बहुधा भारतीयांत आढळणाऱ्या कुठल्या तरी सोनेरी जनुकाचा (जीन्सचा) अमेरिकन माणसांत अभाव असावा!
· सोन्याच्या दागिन्यांच्या खपात अमेरिका दुसरी; पहिला अर्थात भारत!
· सोन्याचं भारतीयांइतकं महत्त्व अमेरिकी माणसाला नाही.
· मध्यमवर्गीय अमेरिकी माणसांकडे सोन्याचे दागिने अत्यल्प.
· पुरुषांना सोन्याच्या कुठल्याच दागिन्यांचे आकर्षण नाही.
· वेडिंग रिंग सोन्याची नव्हे; तर हिऱ्याची असणे प्रतिष्ठेचे.
· अमेरिकेतील सोन्याचे दागिने 24 नव्हे; तर 14 किंवा 18 कॅरेटचे.
· अमेरिकन स्त्री दागिना खुलून दिसेल की नाही, याचा विचार करते; तो किती कॅरेटचा, याचा नव्हे!
· वेळप्रसंगी सोन्यापेक्षा चांदीच्या दागिन्यालाही प्राधान्य. सोन्याच्या दागिन्यांचा अट्टहास नाही.
· सोन्याच्या तुलनेत चांदीला कनिष्ठ समजण्याचा प्रकार अमेरिकेत नाही.
· अमेरिकी माणूस सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत नाही. सोन्याचे दरही त्याला अनेकदा माहीत नसतात.
· सोन्याच्या दराच्या चढ-उताराचा परिणाम सर्वसामान्य अमेरिकी माणसावर होत नाही.
· चंदेरी दिसणाऱ्या पांढऱ्या सोन्याचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य. सोन्यात पॅलाडियम, निकेल किंवा तांबे मिसळून तयार होते पांढऱ्या रंगाचे सोने.
· एकंदरीत अमेरिकी समाजात भारताच्या तुलनेत सोन्याविषयी अनास्था. संबंधित बातम्या
· 'पीएनजी'चा अमेरिकेतील दुसरा वर्षपूर्ती सोहळा

आम्ही युवक
आम्ही युवक
12 जानेवारी- राष्ट्रिय युवा दिन. तरुणांना, "ते तरुण आहेत' याची जाणीव करुन देणारा दिवस. आपण जगत असतानाची प्रत्येक अवस्था खरं तर फार सुंदर असते. लहानपणची निरागसता ते वृद्धावस्थेतील प्रगल्भता असा आपला प्रवास सुरुच असतो. पण यातही तारुण्य विशेष महत्त्वाचं! कारण याच काळात आपण आपल्यातल्या "स्व'ला ओळखण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला जे आवडतं तेच करण्याचा अट्टाहास आपण करत असतो. कितीही अवघड प्रसंग आले तरी त्यावर मात करण्याचा आपला ध्यास असतो. हीच तर तरुणाची खरी ओळख आहे. प्रसिद्धी, पैसा या गोष्टी तर आहेतच; पण स्वत:ला सिध्द करण्याचा हा काळ असतो. एवढ्या मोठ्या जगात, इतक्या माणसांमध्ये लोकांना आपला चेहरा लक्षात रहावा यासाठी आपली धडपड सुरु असते.
पण "तारुण्य' म्हणजे फक्त हेच नाही. "आपण तरुण आहोत' म्हणजे काय आहोत, काय काय करु शकतो, हे जरी आपल्याला कळलं तरी बरंच काही करण्यासारखं आहे हे कळेल. तारुण्य म्हणजे उत्साह, तारुण्य म्हणजे चैतन्य, तारुण्य म्हणजे महत्त्वाकांक्षा! तारुण्याला कशाचीही उपमा दिली तरी काहीतरी कमी असल्यासारखं वाटेलच.
आपल्या प्रतिभेला कोणत्याही बंधनात न अडकवता मुक्तपणे त्याची उधळण करावी, आपल्या सर्व जाणीवा प्रगल्भ कराव्यात, जेवढं काही शिकता येईल, जेवढं काही चांगलं करता येईल ते करावं अशी उर्मी याच वयात तर प्रबळ असते.
खरं तर "वय' हा काही तरुणपण ठरवण्याचा योग्य मापदंड नाही. आपण मनाने किती तरुण आहोत, हे महत्त्वाचं! न थकता, न कंटाळता नव्यानं आयुष्य जगण्याची इच्छा आपल्याला होत असली की आपण तरुणच आहोत, हे समजावं. आता तारुण्याची किती व्याख्या सांगायच्या? तरीही ती व्याख्या प्रत्येकाची त्याच्या त्याच्या स्वभावानुसार वेगळीच असणार. तरीही, अमित सामर्थ्याने आणि दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने भव्य-दिव्य स्वप्नं साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाच्या व्याख्येतले शब्द जरी वेगळे असले, तरी अर्थ मात्र एकच असतो. हे साध्य करण्यासाठी आधी आपला स्वभाव ओळखून आयुष्याची दिशा ठरवायला हवी. आणि एकदा दिशा ठरवली की त्या मार्गाने भक्कम पावले टाकायला सुरवात करायची. आपल्या मनात अनेक गोष्टी असतात. त्या आपल्याला करायच्याही असतात. पण आज करु, उद्या करु यात त्या गोष्टी करायच्याच राहून जातात. आणि मग नंतर आपण सांगतो की," अरे मला हे शिकायचं होतं, पण वेळच मिळाला नाही, कामच खूप होतं,' वगैरे वगैरे... समजा, जर मला तबला शिकायचाय किंवा हॉर्स रायडिंग शिकायचंय तर वाट कशाला पाहा? लगेच शिकू की ती गोष्ट! कोणत्याही गोष्टीला उशीर नको. कारण याच वयात अनेक गोष्टी करण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद असते. म्हणूनच तरुणपण महत्त्वाचं!
या तरुणाईचे रंग अनेक आहेत. आशेचा, निराशेचा, प्रेमाचा, ध्येयाचा, आकांक्षेचा...! या सर्व रंगांमध्ये आपण कशाप्रकारे रंगतो यावर बरेच काही अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपल्यावर, आपल्या स्वप्नांवर आपण समाजाचंही भविष्य घडवू शकतो. काहीतरी चांगलं होण्याची आशाच आपल्याला कार्यप्रवण करते, तर कधीतरी आलेली निराशा इतर लोकांचं खरं रुप आपल्याला दाखवते. प्रेमाचा गुलाबी रंग आपल्या प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. त्याच गुलाबी रंगात गुरफटल्यामुळे मुली झिरो फिगरच्या मागे लागतात तर मुलं हिरो बनण्यासाठी जिममध्ये झिजतात. आरोग्यवगैरे त्यानंतरच्या गोष्टी! ध्येयाचा आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर तर आपण खऱ्या अर्थाने जगत असतो. असे अनेक रंग आपलं आयुष्य कळत-नकळतपणे घडवत असतात. आपण ते जर डोळसपणे पाहिलं तर त्यात जास्त मजा आहे.
वयानुरुप आलेलं तारुण्य एकदाच येतं. त्या काळात काय काय करायचं? प्रत्येकानं आपल्या मनासारखं वागावं (अर्थात इतरांना त्रास होऊ न देता!), आपल्यातली सर्व शक्ती, सगळी प्रतिभा, सगळी ऊर्जा यांची स्वच्छंदपणे उधळण करावी. याचबरोबर आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीचेही भान असावं. कारण जबाबदारीच आपल्याला वास्तवता शिकवते. आपण युवक आहोत आणि आपल्याकडे जे काही चांगलं आहे, ते इतरांना देण्याचीही ताकद आपण बाळगून आहोत. हे लक्षात ठेवून जर आपण स्वत:लाच शोधायचा प्रयत्न केला तरच आपण नवनिर्मितीची स्वप्नं पाहू शकतो.
म्हणूनच या "युवा दिना'च्या निमित्ताने आपण आपल्या मनाशी काही ठाम निश्चय करु की जेणेकरुन आपलं आयुष्य अधिक सुंदर होईल. मिळालेल्या तारुण्याचा पुरेपूर उपभोग घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. बाकी मजा, मस्ती अशा गोष्टी तर आहेतच. त्या आत्ताच करायच्या नाहीतर मग कधी? चला तर मग, काहीतरी चांगलं करुन दाखवूच. नुसतं बोलून काय होणार आहे?

सुसाट गर्ल्स
सुसाट गर्ल्स
एकदम भारीतल्या पॉवर बाईकवरून लेदर जॅकेट, ग्लोव्हज, स्टाइलिश हेल्मेट, ग्लॅडिएटर गॉगल घालून दमदार एन्ट्री... बाईक थांबवल्यावर एक-दोनदा ऍक्सलेटर रेझ करून, सिंहाच्या डरकाळीप्रमाणे आवाज काढून गाडी बंद... त्यानंतर स्लो मोशनमध्ये हेल्मेट काढून स्मितहास्य- थोडक्यात माज... अशी ठरलेली हिरोची एन्ट्री आपल्या सगळ्यांच्याच डोक्यामध्ये फिट्ट बसली आहे.
"लेकिन यहां पे पिक्चर में थोडा चेंज होने का...' इथे आता खुरटी दाढी असलेल्या हिरोच्या ऐवजी मुलगी किंवा बाई आणा. लवकर इमॅजिन होत नाही. सहाजिकच आहे म्हणा आणि इमॅजिन झालं तरी सहन होत नाही.
मुलगी बाईक चालवतीये म्हटलं, की अजूनही आपल्या भुवया उंचावतात. त्यात स्टंट करणं म्हणजे जरा अतीच! पॉवर बाईक, लेदर जॅकेट, ग्लोव्हज, स्टाइलिश हेल्मेट ही सगळी मुलांची मक्तेदारी! हे सगळं आणि मुलगी हे कॉम्बिनेशन डोळ्यांसमोर येतच नाही. याची सवय आता निदान पुण्यातल्या लोकांनी तरी करून घ्यायला पाहिजे; कारण भारतातील पहिला "स्टंट रायडर्स गर्ल्स' ग्रुप आपल्या पुण्यात आहे. पुण्यात एकमेव असलेला हा ग्रुप 2006 मध्ये तयार झाला. हा ग्रुप फक्त हौशी बाईक रायडिंगच करत नाही, तर निरनिराळे चित्तवेधक स्टंट्सही करतो. थोडक्यात काय, यांनी मुलांची याही क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढलीय.
या स्टंट रायडर ग्रुपची फाउंडर मेंबर असलेली प्रिया पाटील म्हणते, ""लहानपणापासूनच मला बाइकिंगची खूप क्रेझ होती. माझ्या ऍक्टिव्हावर प्रॅक्टिस करताना मी व्हीली करणं, तशीच होल्ड करणं, असे काही स्टंट करायला लागले.'' अशीच आवड असणाऱ्या मुली तिला पुण्यातच मिळाल्यावर त्यांनी हा ग्रुप फॉर्म केला. आठवड्यातून एक दिवस भेटून त्या वेगवेगळ्या स्टंट्सची प्रॅक्टिस करतात. नीट तयारी झाल्यावर यातील काही मुलींनी "स्पीड रन' या प्रतिष्ठित स्पर्धेत भागही घेतला. तसंच या ग्रुपनं "स्टंट मेनिया' या रिऍलिटी शोमध्येही भाग घेतला.
त्यामुळे त्यांचं खूप कौतुकही झालं. ""बाईकचं फॅसिनेशन फक्त मुलांनाच असतं हा समज चुकीचा आहे. मुलींनाही तेवढंच फॅसिनेशन असतं.'' असं यात भाग घेतलेल्या सॉफ्टीनं सांगितलं. तिनं मुंबईच्या सीपीएए या एनजीओनं आयोजित केलेल्या अँटी टोबॅको राइडमध्ये भाग घेतला होता. त्या अंतर्गत तिनं 12 दिवसांत 12 शहरांना भेट देऊन तब्बल 7000 किलोमीटर अंतर पार केलं. ती सध्या बाइकवरून लडाखला जायचं प्लॅनिंग करत आहे.
हे स्टंट करत असताना अपघातही होतात; पण पडणार नाही ती बायकर कसली? ""पडलं तर काय होईल, हा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही. तो एक शिकण्याचाच एक भाग आहे,'' असं प्रिया पाटील आवर्जून सांगते. एकदा मुग्धा चौधरी बाईक 90 डिग्रीमध्ये कॉप व्हीली करून ती होल्ड करण्याच्या प्रयत्नांत पडली. तिच्या कॉलर बोनला दुखापत झाली; पण ती थांबली नाही. ती हसून म्हणते, ""चांगलं शिकण्यासाठी एक-दोन वेळा पडायलाच लागतं; पण त्यामुळे भीती वाटत नाही. उलट अजून प्रॅक्टिस करण्याचा इंटरेस्ट वाढतो.'' आता या सगळ्या मुली पुढच्या स्पीड रनसाठी कसून तयारी करत आहेत.
सो गाइज, आता बाइकवर सुसाट सुटलेली मुलगी पाहून तोंड वाकडं करू नका, नाहीतर गाडी थेट तुमच्यावरच व्हीली मारेल!
"बाईकचं फॅसिनेशन फक्त मुलांनाच असतं, हा अगदी चुकीचा समज आहे. आम्हा मुलींनाही तेवढंच फॅसिनेशन असतं!'
"लहानपणापासून मला बाईकिंगची खूप क्रेझ होती. सुरवातीला मी माझ्या ऍक्टिव्हावर प्रॅक्टिस सुरू केली. ऍक्टिव्हा व्हीली करणं, तशीच होल्ड करणं, असे स्टंटचे प्रकार मी करू लागले.'
"पडलं तर काय होईल, हा विचार माझ्या कधी मनातच आला नाही. तो एक शिकण्याचाच भाग आहे!'
"चांगलं शिकण्यासाठी एक-दोन वेळा पडायलाच लागतं; पण त्यामुळे भीती वाटत नाही. उलट अजून प्रॅक्टिस करायचा इंटरेस्ट वाढतो.'

हसा
हास की!
हा ऽ ऽ ऽ हा ऽ ऽ ऽ...हा....
ही ऽ ऽ ऽ ही ऽ ऽ ऽ ही....
काय?
अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? हसतोय....
कशाला? आयला... मला वाटलं म्हणून! तू पण हास की!
हे धकाधकीचं की काय म्हणतात ते जीवनबीवन सुरू झाल्यापासून काही लोक "हसणे' हा छंद म्हणून आवडीने जोपासायला लागलीएत. शिवाय, "इथं मरायला वेळ नाही, हसणार कुठून?' हा प्रश्न असतोच. एवढे काय वैतागलेत लोक?
आपल्याला तर हसायला खूप आवडतं. मी तर हसायला कारणंच शोधत असतो अन् कधी कधी तर कारणाचीही गरज पडत नाही. आता याला कुणी "वेड लागलंय' म्हणेल, कुणी "दुसरे काही काम नाही का?' म्हणेल. पण मला काही फरक पडत नाही. कारण त्या हसण्याने मला जी उर्जा मिळते, त्याला तोड नाही.
मनापासून हसायला कोणत्या प्रशिक्षणाची गरज पडतच नाही. हसरं मन आणि हसरा स्वभाव असला की झालं काम! आता, मी काय इथे "हसायचे कसे, का आणि केव्हा?' यावर प्रवचन वगैरेसारखी भंकस करणार नाहीए. पण येता-जाता, लोकांकडे बघताना, बोलताना सारखं जाणवत राहतं, की काहीतरी missing आहे. आजकाल लोक हसायलाच विसरलीएत की काय, अशी शंका येतेय. मग अशा विषयावर आम्ही मित्र जेव्हा चर्चा करतो, (हसणारे लोक गंभीर नसतात हा गैरसमज दूर करा, काय?) तेव्हा लोकांच्या वृत्तीतच बदल झालेला दिसून येतो. माझ्या ओळखीचा भूषण नावाचा एक चांगला फोटोग्राफर आहे. त्याचं observation असं आहे, की लोकांकडे जसजसा पैसा येत जातो, तसं त्यांचं हसणंही खूप reserved होत जातं. हसा म्हटलं की बळजबरीने ओठ हलतात. दात तर दिसतच नाहीत. हसल्यामुळे आपलं प्रेस्टिज कमी होईल की काय, अशी भीती बहुतेक लोकांना वाटतीय.
खरं तर, "हसणे' हा एक आरोग्यदायी रोग आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. या रोगाची लागण होतेच. आता बघा, सारसबाग, जॉगर्स पार्क किंवा अजून कुठेही "हास्यक्लब' चालू असतात. अनेक माणसं तिथे कृत्रिम हास्य करत असतात. आपण त्यांच्याकडे दोन मिनिट जरी पाहिलं तरी आपल्याला हसू येतं. भले ते खोटं हास्य असू द्या. त्या हसण्याच्या प्रभावामुळे वातावरण बदलून जातं. कृत्रिम हास्यामुळे त्या माणसांच्या शरीरावर तर चांगला परिणाम होतोच, शिवाय ते इतर येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही हसू आणतात. कृत्रिम हास्याचा एवढा प्रभाव तर नैसर्गिक, निर्मळ आणि खळाळून हसण्याचा केवढा परिणाम होईल!
आता हसायचं म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळी एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन, आपापली पोटं धरून हसायला सांगत नाही. पण प्रत्येकाने आपलं हरवलेलं हास्य शोधलं पाहिजे. सगळं आजूबाजूलाच असतं. पण आपणच डोळ्यांवर झापडं लावल्याने आपण अनेक गोष्टींना मुकतो. तुम्ही कधी फूल उमलताना पाहिलं आहे का? ऋतू बदलतो तेव्हा जमिनीचा रंग बदलताना पाहिला आहे का? ज्यांना आपण निर्जीव म्हणतो, त्या गोष्टीही निसर्गाला प्रतिसाद देतात, मग आपण का आडमुठेपणा करतो? समोरच्या गोष्टीला साद घातली की प्रतिसाद येतोच. फक्त त्या वेव्हलेंग्थशी आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे.
परवाच मी दुर्गाबाईंचं "ऋतुचक्र' वाचलं. प्रत्येक ऋतूत निसर्गात घडून येणाऱ्या बदलांचं जे वर्णन दुर्गाबाईंनी केलंय, त्याला तोड नाही. पुस्तक वाचताना जणू तो ऋतूच आपल्याभोवती अवतरतो. ते पुस्तक वाचताना मला जे समाधान वाटत होतं, तो ही हसण्याचा एक प्रकार आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांत काही काम करणारे लोक म्हणतात, की कामाचा ताण एवढा असतो, की हसणार कधी? पण कामाचा आनंदही घेता येतोच की! कचकावून काम केल्यावर जो आनंद मिळतो, तो अवर्णनीयच असतो. अर्थात, काम म्हणजे वैताग, अशीच तुमची व्याख्या असेल तर मग अवघड आहे.
आपण हसण्याचीही वर्गवारी करून टाकली आहे. नाजूक हसणं म्हणजे समजूतदारपणाचं लक्षण, दात दाखवून हसणं म्हणजे मोकळ्या स्वभावाचं लक्षण आणि खळाळून हसणं म्हणजे बालिशपणा! हे असं हसणं आणि असणं हे कधी कधी खरं असलं तरी ते तसंच असतं हे खरं नव्हे. आपण उगाचच त्या फॉर्ममध्ये अडकून पडतो, आणि उत्स्फूर्त हास्यक्षणांना मुकतो.
मैत्रीचा आनंद, कामाचा आनंद, प्रेमाचा आनंद, शांत बसण्यातलाही आनंद, निसर्गात क्षणाक्षणाला फुलणारा आनंद..... या सगळ्याचा आनंद आपण अवश्य लुटलाच पाहिजे. काहीतरी भुक्कड कारणं सांगून आपण आपल्या खऱ्या आयुष्यापासून पळून जातो आणि मग जो आनंद, जे हास्य गमावून खोऱ्याने पैसा कमावलेला असतो, तोच पैसा मानसिक ताण घालविणाऱ्या शिबिरांमध्ये खर्च करतो. म्हणजे जे फुकटात, सहज आणि स्वच्छ स्वरूपात उपलब्ध आहे, ते सोडून उलटा घास आपण घेत बसतो. दुर्दैवाने समाजालाही असल्याच लोकांचं जास्त कौतुक आहे. असेही लोक आहेतच, की जे स्वत:च्या हिमतीवर, कर्तृत्वावर अमाप पैसा कमावत आहेत आणि तरीही आपल्या बालपणाशी त्यांची नाळ तुटलेली नाही. म्हणूनच त्यांचं हसणं अजून टिकून आहे.
पैसा मिळाला की आनंद मिळतो, हे निखालस चूक आहे. आपण जर रस्त्याने जाताना इकडेतिकडे पाहिलं तर लहान मुलांच्या, काम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहा. आपण आपलं असणं विसरतो, एवढं ते निर्मळ असतं. यावर तुम्ही म्हणाल, तुला त्यांचं दु:ख माहीत नाही. उलट माहीत आहे म्हणूनच त्यांच्या हसण्याचं मोल जास्त आहे.
आता मी तरी किती बडबड करणार आणि तुम्ही तरी किती सहन करणार! शिवाय मघाशी मीच लिहिलंय, की शांत बसण्यात आनंद असतो म्हणून! तर हाच आनंद मी तुम्हाला देतो. बाकी, देण्यातला आनंदही काही औरच असतो. शिवाय टिकाऊ आणि उत्तम प्रतीचा! तिकडे चंद्रपूरला बाबा आमटेंनी माणसांचा कुष्ठरोग बरा करून त्यांच्यात जो आनंद फुलवलाय, त्याची बीजं सर्वत्र पसरली आहेत. आपण ती शोधत नाही, रुजवत नाही. चला, शोधू या! तसं जर खरंच करता आलं तर आपणही तशी अनेक "आनंदवनं' फुलवू शकतोच की!

रविवार, ९ जानेवारी, २०११
सायकल - विनोदी कथाकथन
भाडयाची सायकल घेऊन आम्ही खूप फिरलो. तहान लागली म्हणून एका हॉटेलसमोर सायकल लावली. मस्तपैकी चहा प्यायलो. तिथून निघालो तर थेट संध्याकाळ होईपयर्र्ंत फिरलो. मध्येमध्ये खिशातल्या पैशाचा आणि सायकलच्या वापरलेल्या तासांचा तालमेळ जमतो की नाही ते बघत होतो. नाहीतर त्या सायकलवाल्याला एकदीवसासाठी का होइना फुकट पंचर काढणारा पोऱ्या मिळायचा. संध्याकाळी सायकल परत करायला गेलो.
''किती झाले ?'' राम्याने सायकलवाल्याच्या ताब्यात सायकल देत विचारले.
सायकलवाला म्हणाला, ''अरे, ही कुणाची आणली तुम्ही... ही माझी सायकल नाही ''
आम्ही तर हबकलोच.
''अरे, तुझं डोकं वगैरे फिरलं की काय ?'' राम्या म्हणाला
''आम्ही आज सकाळी तुझ्याकडून तर घेऊन गेलो होतो''
''ते मला माहीत आहे पण ही कुणाची सायकल आणली तुम्ही?'' सायकलवाला म्हणाला, ''ही विमल सायकल स्टोअर्स वाल्याची त्याचं दुकान स्ट/न्डपाशी आहे माझं बघा कमल सायकल स्टोअर्स'' त्याने बोर्डाकडे हात दाखवीत म्हटले. आम्ही त्याच्या एका खिळयाला लटकुन कसरत करणाऱ्या बोर्डकडे बघीतलं. त्या बोर्डवरची अक्षरं वाचण्यासाठी आम्हाला मानेच्या व्यायामाचे बरेच प्रकार करावे लागले. खरंच ती त्याची सायकल नव्हती.
''आता झाली ना पंचाईत'' मी राम्याला म्हणालो,
''राम्या , आता माझ्या लक्षात आले अरे , आपण हॉटेलवर चहा प्यायलो ना तिथं अदलाबदली झाली बहुतेक आणि ही दुसरी कुणाचीतरी सायकल आपण इथे घेऊन आलो''
''पण सायकलला तर कुलूप होतं'' राम्या म्हणाला.
'' तिची चावी हिला लागलेली दिसते असं होतं कधीकधी '' मी म्हटलं.
''याचा अर्थ आपली सायकल कमल सायकलवाल्याकडे गेली असणार'' राम्या म्हणाला.
राम्याच्या डोक्यात निव्वळच भेद्र नसावेत हा माझा विश्वास तेव्हा प्रथमच बळावला. पण दुसऱ्या क्षणीच राम्याने एक गहन प्रश्न विचारला आणी तो विश्वास दुबळा पडला. त्यानं विचारलं -
'' आता आपल्याला स्टॅंडवर कमल सायकलवाल्याकडे जावे लागणार... जातांना आपण या त्याच्या सायकलवर जावू शकतो पण परत येतांना कसं यायचं ?
आम्ही दोघं पुन्हा सायकलवर बसलो आणि स्ट/न्डवर निघालो कमल सायकलवाल्याकडे.
तिथं गेलो तर ''ही आली ही आली'' म्हणत एका ग्राहकाने आनंदाने आमचं स्वागत केलं.
त्याच्याजवळ आमची सायकल होती. दोन्ही सायकली दिसायला एकदम सेमटूसेम होत्या. जश्या जुळया बहिणी. तो एकटाच होता. आम्ही दोघं होतो.
आम्हा दोघांना पाहून तो चिडतच पण दबक्या आवाजात म्हणाला , ''काय राव, तुम्ही माझी सायकल घेऊन गेलात.''
''तू नेली की आम्ही ?'' संख्याबळाचा फायदा घेत राम्याने त्याच्यावर हल्ला चढवला.
''तुमचं बरं तुमचं कुलूप तरी उघडलं माझं तर कुलूपपण उघडलं नाही इतक्या दूरवरून ढुंगण वर करून चालवत आणली हिला '' त्याने परत चिडक्या सुरात म्हटले.
याने ढुंगण वर करून सायकल कशी चालवली असेल याची आम्हाला कल्पना करवेना. माझी तर हिम्मत झाली नाही पण राम्या थेट त्या मानसाच्या पार्श्वभागाकडे अविश्वासाने पहायला लागला.
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे आणि राम्याच्या पाहण्याचा रोख पाहून तो म्हणाला, ''अरे बाबांनो ढुंगण या सायकलचं माझं नाही या सायकलचं लॉक उघडलं नाही म्हणून मागचं चाक उचलून इथपयर्र्ंत ढकलत आणली हिला'' त्याने सायकलचं मागचं चाक उचलून दाखवीत म्हटले.
क्रमशः ...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)